Jayant Patil : अमृत काळातल्या अर्थसंकल्पाची जनतेला उत्सुकता…
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाला अमृत काळातला असं संबोधलं आहे. पण हा अमृत काळ काय आहे, कधी येणार? अमृत काळातील गोष्टींची जनतेला उत्सुकता लागली असल्याच्या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते, त्यावरुनही त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे सुरतला गेले नसते तर…@Jayant_R_Patil #CMO #eknathshinde https://t.co/iikj0cVV69
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 14, 2023
नूकताच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला आहे. जयंत पाटलांनी फडणवीसांच्या अमृत काळातल्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, फडणवीसांनी पंचामृत अर्थसंकलपाची थेरी मांडली आहे. पंचामृत म्हणजे आम्हाला माहीत आहेत. पण देवेंद्र फडणवीसांनी वेगळंच पंचामृत मांडल असल्याची टीका त्यांनी केलीय.
मुख्यमंत्र्यांच्या सुरत दौऱ्यावरुन जयंत पाटलांनी घेतली फिरकी…
तसेच फडणवीसांनी अमृत काळातला अर्थसंकल्प म्हटलयं. हा अमृत काळ म्हणजे नक्की कोणता, काय, कधी येणार? कोणत्या गोष्टी अमृत काळात होणार? या सर्व गोष्टींचं जनतेला औत्सुक्य लागलंय. अमृत काळ काय आम्हाला माहीत नाही. आम्हाला शिवकाळ माहीत असून आम्हाला त्यात रस आहे. शिवस्वराज्यात जास्त रस असल्याचं ते म्हणालेत.
Shivaji Kardile :अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच कर्डिलेंकडून मोठी घोषणा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नाहीत. ते येतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांना सतत कानाला लागून आठवण करुन दिली तर बरं होईल. कानाला लागणाऱ्यांचं कधीही भलं होत नसल्याचंही त्यांनी उद्योगमंत्री शंभूराज देसाईंना संबोधून म्हंटले आहेत. जाऊ देत तो तुमचा प्रश्न आहे, मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सांगत असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात काही दिवसांपासून महापुरुषांचा अवमान केला जात होता. तेव्हा शिंदे-फडणवीस सरकार काय करत होतं? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. महापुरुषांचा अवमान करणारे आम्हाला कायमचे नको असल्याचंही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलंय.