कर्नाटकमध्ये एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, हा फार्म्युला काँग्रेस देशभर राबविणार; मोदींचा खळबळजनक दावा

कर्नाटकमध्ये एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, हा फार्म्युला काँग्रेस देशभर राबविणार; मोदींचा खळबळजनक दावा

PM Modi meeting in Kolhapur : देशभरात सुरू असलेल्या लोकभेच्या रणसंग्रामात भाजपच्या सर्वच नेत्यांच्या मोठ्या प्रचार सभा सुरू आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सभांचा मोठा धडाका देशभरात सुरू आहे. (PM Modi) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंणगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरमधील तपोवन मैदानात सभा झाली. यावेळी मोदींनी काँग्रेसवर घाणाघाती आरोप केले.

 

मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिटकरींचा संताप; म्हणाले, संजय मंडलिकांनी वक्तव्य देताना…

मुस्लिमांना ओबीसी बनवलं

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक काँग्रेस सरकारचा संदर्भ देत काँग्रेवर टीका केली. कर्नाटमध्ये काँग्रेस सरकारने ओबीसी कोट्यातील 27 टक्के आरक्षणात मुस्लिमांना सामावून घेतल आणि येथील मुस्लिमांना ओबीसी बनवलं असा खळबळजनक दावा करत ओबीसींच्या हक्काचं आरक्षण लुटलं असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसंच, हा फॉर्मुला देशभरात लागू करण्याचा यांचा प्रयत्न आहे असंही मोदी यावेळी म्हणाले.

 

संविधान बदलून आरक्षण वाटणार

2012 मध्ये युपीए सरकाने हा प्रयत्न केला होता. पंरतु, त्यावेळी यांना यश आलं नाही. परंतु, काँग्रेस आता संविधान बदलून ओबीसी, दलीत आदिवासी यांच्या वाट्याचं आरक्षण मुस्लीमांमध्ये वाटणार आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला. त्यामुळे यांना एकही जागा मिळता कामा नये असंही मोदी यावेळी म्हणाले.

 

कोल्हापूरच्या बंडखोराविरोधात काँग्रेसचं कठोर पाऊल : ठाकरेंच्या मागणीनंतरही विशाल पाटलांना मात्र अभय?

इन हेरीएशन टॅक्स लावणार

यावेळी मोदींनी काँग्रेस तुस्टीकरण करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो अशी टीका केली. जीवनभर आपण जे कमावताल ते पूर्ण आपल्या वारसांना मिळणार नाही अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यावरून मोदींनी काँग्रेवर टीका केली आहे. आपण हयात नसला तरी आपली संपत्ती इन हेरीएशन टॅक्सच्या माध्यमातू लुटणार आहेत असाही आरोप मोदींनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube