Kasba Result : “फडणवीसांना कळलं असेल की…” धंगेकरांच्या विजयानंतर राऊतांनी सुनावल

Kasba Result : “फडणवीसांना कळलं असेल की…” धंगेकरांच्या विजयानंतर राऊतांनी सुनावल

मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यापैकी कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाला मोठा धक्का दिला. भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत करत कसब्यात २८ वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपा पक्षाचा झेंडा खाली आला. मात्र दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाला आपली जागा कायम राखण्यात यश मिळालं आहे.

https://www.youtube.com/watch?v=BERIduaZOvg

या ठिकाणी महाविकास आघाडीतील बंडखोरीचा मोठा फटका बसला. भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. असं असतानाच दोन्ही निकालांवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला खोचक शब्दात टोला लगावला. राऊत यांनी कसब्यामध्ये भाजपा उमेदवारासाठी प्रचारसभा घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा थेट उल्लेख करत त्यांनी सुनावल.

प्रतिभा धंगेकर म्हणाल्या…भाजपचा खोटारडेपणा निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाला

आतापर्यंत भाजपा आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर कसबा जिंकत आली. आता दिल्ली आणि फडणवीसांना खरी शिवसेना कोणती आहे, हे देखील कळलं असणार आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कसब्यामधील निकालासंदर्भात संजय राऊत यांनी दिल्ली, महाराष्ट्र आणि फडणवीस यांचा उल्लेख करत खरी शिवसेना ठाकरे गटाचीच असल्याचे सुनावलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. आतापर्यंत कसब्यामध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपा जिंकत आली होती. आज महाराष्ट्राला, दिल्लीला आणि फडणवीसांना कळलं असणार आहे, की खरी शिवसेना कुठे आहे, असं संजय राऊत यांनी सुनावल आहे.

तसेच चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बंडखोरीचा फटका बसला असल्याचे देखील यावेळी राऊतांनी सांगितल. चिंचवडची जागा सुद्धा पहिल्या फेरीपासून जिंकू शकत होतो. परंतु, अजून तिथे संघर्ष सुरु आहे. एका बरोबरच लढत झाली असती तर ती देखील जागा सुद्धा जिंकलो असतो,” असं राऊत चिंचवडमधील निकालावर सांगितल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube