जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 100 कोटीहून अधिकचा निधी वर्ग

Kisan Sanman Yojana : किसान सन्मान योजनेच्या (Kisan Sanman Yojana) माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असून, योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली असून, वर्षाला ६ हजार रुपये थेट बॅक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१९ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये जमा झाले असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, सद्य परिस्थितीत पेरणीची कामे सुरु असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरते. यापुर्वी १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या अनेक योजनांपैकी किसान सन्मान योजना ही महत्वपूर्ण ठरली असून, केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुरु केलेल्या सर्व योजना अखंडीतपणे सुरु आहेत. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र सरकारकडून सातत्य राखले आहे.
अकोले तालुक्यातील ३४ हजार ९४८ शेतकऱ्यांना ६ कोटी ९९ लाख, जामखेड २९ हजार ५८ शेतक-यांना ५ कोटी ८१ लाख, कर्जत ४३ हजार ६१० शेतकऱ्यांना ८ कोटी ७२ लाख , कोपरगाव २९ हजार ६४० शेतकऱ्यांना ५ कोटी ९३ लाख, अहिल्यानगर ३१ हजार २० शेतकऱ्यांना ६ कोटी २० लाख, नेवासा ५४ हजार २८९ शेतकऱ्यांना १० कोटी ८६ लाख, पारनेर ५० हजार ३८३ शेतकऱ्यांना १० कोटी ८ लाख, पाथर्डी ३९ हजार ९५५ शेतकऱ्यांना ७ कोटी ९९ लाख, राहाता २४ हजार १०८ शेतकऱ्यांना ४ कोटी ८२ लाख, राहुरी ३८ हजार ५६३ शेतकऱ्यांना ७ कोटी ७१ लाख
Asia Cup 2025 भारताला धक्का, जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर?
संगमनेर ५९ हजार १२८ शेतकऱ्यांना ११ कोटी ८३ लाख, शेवगाव ४१ हजार ९०१ शेतकऱ्यांना ८ कोटी ३८ लाख, श्रीगोंदा ५० हजार ५७१ शेतकऱ्यांना १० कोटी ११ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३४३ शेतकऱ्यांना ४ कोटी ४७ लाख रुपये. अशा रक्कमा तालुका निहाय शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.