इर्शाळवाडीत सध्याची परिस्थिती काय? फडणवीसांनी दिली विधानसभेत क्षणा-क्षणाची अपडेट

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 20T113101.065

Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी सभागृहामध्ये माहिती दिली आहे.

Raigad Landslide : इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर; राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

फडणवीस म्हणाले की, “पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून तात्पुरत्या हेलकॉप्टरची उभारणी करण्यात आली आहे. काल रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. 11 च्या दरम्यान ही घटना प्रशासनाला कळली. 12 वाजता राज्य नियंत्रण कक्षास त्याची माहिती मिळाली. यानंतर प्रशासन घटनास्थळी पोहोचले. आत्तापर्यंत 98 जणांना वाचविण्यात यश आले आहे. सकाळी सव्वा दहा पर्यंतच्या माहितीनुसार आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीमध्ये 48 कुटुंब वास्तव्यास आहे. त्यापैकी 25 ते 28 कुटुंब ही बाधित झाली आहे, असे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. 228 नागरिकांपैकी 70 नागरिक हे स्वत: घटनेच्यावेळी सुरक्षित असल्याचे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे. 21 लोक जखमी असून 17 लोकांना तात्पुरत्या बेस कँपमध्ये उपचार करण्यात आले तर 6 जणांना पनवेल्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.”

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

इर्शाळवाडीत नेमकं काय घडलं ?

महिला म्हणाली, ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’

 

Tags

follow us