Love Jihad : नितेश राणे यांचे सुप्रिया सुळेंना आव्हान
मुंबई : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहादवरुन (Love Jihad) पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘मी हे आव्हान स्वीकारतो’ असं म्हणत राणेंनी सुप्रिया सुळेंच आव्हान स्वीकारलं आहे.
सुप्रिया सुळेंनी लव्ह जिहादबाबद जे भाष्य केले. त्यांसदर्भात मी लव्ह जिहादवर चर्चा करायला तयार आहे. मी आव्हान स्वीकारतो, असं म्हणत सुप्रिया सुळेंना चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. राणे म्हणाले की, लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींची फसवणूक होते. त्यांचे आयुष्य खराब केले जाते. याची असंख्य उदाहरणे, संबंधित मुलींना भेटवण्यापासून मी द्यायला तयार आहे.
खरंतर कुणी कुणासोबत लग्न करावे, यावर आक्षेप नाही. परंतु लग्नाच्या नावाने, प्रेमाच्या नावाने आधी तो अमर होतो. त्यानंतर अमीन होतो. याला प्रेम प्रकरण म्हणत नाही. लग्नानंतर तुम्ही हिंदू भगिनींना नाव बदलायला सांगतात. इस्लाम कुराण वाचायला सांगतात. तिला तिला हिंदू रीतीरिवाज पाळू दिले जात नाहीत. धर्मांतरासाठी बळजबरी केली जाते. तिने विरोध केला तर मारुन टाकण्यापर्यंत मजल जाते’ असं राणे म्हणाले.
दरम्यान, सुप्रियाताईंना त्यांच्या ज्ञानात भर टाकायची असेल तर त्यांनी तारीख, वेळ ठरवावी. लव्ह जिहाद नेमकं कसं होतं? यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य कसं बर्बाद होते. त्याचे सगळे पुराव्यासकट सांगायला तयार आहे, असं आव्हान देत हे ऐकल्यानंतर सुप्रिया सुळेही आमच्यासोबत लव्ह जिहादचं हे आव्हान पेलण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करतील, असा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला.