Video : शरद पवार मोदींच्या टीकेला देणार प्रत्युत्तर; भात्यातून कोणता बाण काढणार?
अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 26) शिर्डी दौऱ्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. ही टीका करताना पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंचावर उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांकडून टीकेची राळ उठवली जात असतानाचा आता खुद्द पवारांनी यावर भाष्य करत आपण यावर भाष्य करणार असल्याचे म्हटले आहे. ते अलिबाग येथे पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar On PM Modi Criticize Statement )
‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’; मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट?
प्रत्युत्तर देताना भात्यातून कोणता बाण काढणार
एकीकडे मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. तर, दुसरीकडे आता स्वतः पवारांनी आपण यावर आता नाही तर, उद्या (दि. 28) बोलणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मोदींना पवार कोणत्या भाषेत प्रत्युत्तर देतात आणि भात्यातून नेमका कोणता बाण बाहेर काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावेळी पवारांनी मराठा आरक्षारणासह अन्य विविध मुद्द्यांवरदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही मागण्या केल्या आहे. याआधी जरांगेंनी उपोषण केलं तेव्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेंशी संवाद केला होता. मात्र, त्यांचं प्रत्यक्षात बोलणं झालं की नाही हे मला माहित नाही. त्यानंतर जरांगेंनी सरकारला 30 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे यांना दोष देता येणार नसल्याचं पवार यावेळी म्हणाले.
Video : मोदींनी संधी साधली! आऊटडेटेड फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर केला ‘प्रहार’
कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?
नरेंद्र मोदींनी काल (दि. 26) शिर्डीत बोलताना शरद पवारांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, “आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले. त्याचवेळी मागच्या सात वर्षांत आमच्या सरकारने एमएसपीवर साडे तेरा लाख रुपयांच्या धान्याची खरेदी केली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लगावला होता.
सुप्रिया सुळेंनी मोदींना करून दिली पुरस्काराची आठवण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टीकेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी आक्रमत होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. मोदींच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील यांच्या पोस्टमध्ये बरीच उत्तरं आहेत.
एकतर मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर ते शरद पवारांचं नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, कधी टीका करताना. राजकारणात एवढं चालतच, इतना हक तो बनता है अशी मिश्कील टिप्पणीदेखील सुळेंनी यावेळी बोलताना केली.