बारसूबद्दल सुपारीबहाद्दरांकडून दिशाभूल; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

बारसूबद्दल सुपारीबहाद्दरांकडून दिशाभूल; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray on Barsu refinery : काही दिवसांपासून बारसू(Barsu refinery), सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण (Political)चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज शनिवारी रत्नागिरीमध्ये जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)आपण मुख्यमंत्री असताना शिंदे गटातील आमदारांनी बारसू प्रकल्पाविषयी दिशाभूल केल्याचा हल्लाबोल केला आहे.

Vindu Dara Singh Birthday: चित्रपटात काम नाही मिळाले विंदू बनला टीव्हीचा ‘हनुमान’

बारसू प्रकल्पावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी राजापूरला आलो होतो. त्यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नाणार येथे हा प्रकल्प नको म्हणून मला एक शिष्टमंडळ भेटलं, त्यानंतर मला घरी येऊनही काही लोकं भेटली.

त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, हा प्रकल्प नाणारमध्ये येणं हे तेथील पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून किती महत्वाचं होतं. म्हणून मी माझी भूमिका मांडली, ती माझी भूमिका आजही आहे. आम्हाला विकास नकोय असं नाही, आपल्याला विकास पाहिजेच, कोणालाही भिकेचे डोहाळे लागलेले नाहीत.

ठाकरे म्हणाले की, इथला माझा बांधव काही भिकारी नाही, तो स्वाभिमानी आहे. कष्टाळू आहे, ताठ माणेनं जगणारा आहे. मग तो नाणार प्रकल्प म्हणजे नाणारला होणारा प्रकल्प रद्द झाला. अनपेक्षितपणे सत्ताबदल झाला. मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी दिल्लीतून सुद्धा आणि आपल्यातले गद्दार जे सुपारी घेऊन फिरतात, ते सुपारीबहाद्दरसुद्धा मला येऊन सांगायला लागले की, साहेब हा प्रकल्प चांगला आहे, तो आपल्याकडून जाता कामा नये.

त्यांना मी सांगितलं की, जाता कामा नये हे ठिक आहे पण आपली भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. की असे कोणतेही प्रकल्प जे संशयास्पद असतात, म्हणून त्या प्रकल्पांची माहिती जनतेला दिली पाहिजे. त्यानंतर ज्यांना त्या प्रकल्पाचं स्वागत करायचं ते करतील. त्याचवेळी विदर्भातील कॉंग्रेसचे नेते आशिष देशमुख ज्यांची आता हकालपट्टी झाली आहे. ते म्हणाले की, हा प्रकल्प आम्हाला विदर्भात द्या, मी त्यावर सांगितलं की, विदर्भात चालत असेल तर घेऊन जा.

आज जसं मी गावकऱ्यांमध्ये आलो तसं सुपारीबहाद्दरांनी प्रेझेंटेशन द्यावं पण जर लोकं या प्रकल्पाचा विरोध करत असतील तर शिवसेना म्हणून मीदेखील त्याचा विरोध करणार असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला आहे. त्याचवेळी ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे जो काही गठ्ठा आला होता, त्यावेळी मला सांगण्यात आलं की, हे तेथील ग्रामपंचायतींचे ठराव आहेत, आम्हाला प्रकल्प पाहिजे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube