बिबट्याचे वाढते हल्ले…वनविभाग उपाययोजनात अपयशी…तनपुरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

बिबट्याचे वाढते हल्ले…वनविभाग उपाययोजनात अपयशी…तनपुरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Leopard Attack in Ahilyanagar : राहुरी तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाणे यांचा पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण नगर जिल्ह्यातच बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेळोवेळी मी यावर आवाज उठवला आहे. मात्र यावर कुठलीही ठोस कारवाई करण्याची मानसिकता सरकारची नाही. हे सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे अशा शब्दात माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

दरम्यान वडनेर येथील गव्हाणे वस्तीवरील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे (वय 55) हे सोमवारी, 10 मार्च रोजी पहाटे शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वनविभागाच्या दुर्लक्षित भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून वनविभाग यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले की, आज ग्रामीण भागात महावितरणच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकास पाणी द्यावे लागते. त्यावेळी या रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यास बळी पडावे लागते. त्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद केल्यावरच मृतदेह ताब्यात घेण्याची मागणी आम्ही केली. काल रात्री नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यात यश आले.

धंगेकर म्हणजे पुण्यातील कराड; हाती ‘धनुष्य’ पेलताच काँग्रेसच्या नेत्यानं उगारला ‘पंजा’

राहुरी तालुक्याकरता किमान शंभर पिंजरे उपलब्ध करून देण्याची आमची मागणी आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना आहेत. मात्र वन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची खरी आवश्यकता आहे. यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधवांसह धरणे आंदोलन करणार आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube