LIC : करणार तब्बल …इतक्या पदांची भरती
नवी दिल्ली ः भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) वतीने प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) पदाच्या तब्बल ९४०० जागांची मेगाभरती करण्यात येणार आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ‘जीवन के साथ भी, जीवन के बाद भी’ असा नारा देऊन घराघरात पोहचलेले आहे. महामंडळाच्या वतीने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता किती लागणार, अर्जाचे शुल्क किती आहे, याबाबत या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप असलेला विद्यार्थी अर्ज करु शकणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) याची एकूण ९४०० जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) १२१६, नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) १०३३, सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) ५६१, ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) १०४९, साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) १४०८, साउथर्न झोनल ऑफिस (SZ) १५१६, वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) १९४२, ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) ६६९ अशी एकूण ९४०० जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० वर्षातील उमेदवार यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. तर अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना ३ वर्षांपर्यंत सूट देण्अयात आली आहे. तसेच जनरल व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना केवळ १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर पूर्व परीक्षा १२ मार्च २०२३ तर मुख्य परीक्षा ८ एप्रिल २०२३ राेजी हाेणार आहे.
https://licindia.in/Bottom-Links/Careers/Recruitment-of-Apprentice-Development-Officer-22-2