ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार; भाजपाचा संताप, चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धवजी, उत्तरं द्या

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार; भाजपाचा संताप, चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धवजी, उत्तरं द्या

BJP Chitra Wagh on UBT Election Advertisement : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात राजकीय पक्षांच्या जाहिराती सुरू आहेत. यातील उद्धव ठाकरे गटाकडून महिला अत्याचारासंबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार पॉर्नस्टार असल्याचे सांगत भाजपने या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कलाकाराचा फोटो दाखवत ठाकरे गटाला राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला.

उद्धव ठाकरेंच्या क्लीनचीटमुळेच संजय राठोड मंत्री, माझा लढा संपलेला नाही; चित्रा वाघ कडाडल्या

ठाकरे गटाने राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न आणण्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार केला आहे. सध्या ठाकरे गटाच्या ज्या जाहिराती येत आहेत. या जाहिरातीमधील जे पात्र आहे ते पॉर्नस्टार आहे. अदुबाळ नाईट लाइफ प्रॉडक्शनने ज्या जाहिराती बनवल्या आहेत त्यातील पात्र पॉर्नस्टार आहे. हाच पॉर्नस्टार जाहिरातीत विचारतो की महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? आणि हाच पॉर्नस्टार लहान वयाच्या मुलींबरोबर अश्लिल चित्रीकरणही करतो असा गंभीर आरोप वाघ यांनी केला.

हा जो कोण व्यक्ती आहे याच व्यक्तीचे एका मोबाइल अॅपवर घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडिओ आहेत. असे बाप जाहिरातीत टाकून आपण बाप असल्याचे ते महाराष्ट्राला दाखवणार आहेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. ही जाहिरात करणारी कंपनी कोणती? त्यांचा आणि या पॉर्नस्टारचा काय संबंध आहे? या कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? या प्रश्नांची उत्तरं ठाकरेंनी राज्यातील जनतेला दिली पाहिजेत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

दावोस दौऱ्यावरुन जुंपली; चित्रा वाघ सुप्रिया सुळेंना म्हणाल्या,’अडीच पैसा देण्याचीही दानत नाही‘ 

एका मोबाइल अॅपवरील वेब सिरीजमध्ये या कलाकाराने काम केलं आहे. त्यावरूनही चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली. या अॅपवर केंद्र सरकारने तत्काळ बंदी आणावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आगामी काळात आम्ही या संदर्भात ज्या भूमिका घ्याच्या आहेत त्या निश्चितच घेऊ असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज