Maharashtra Police : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने आणि ते पोलीस सेवेतेून निवृत्तही होत असल्याने महाराष्ट्र पोलीस दलाला नवे महासंचालक मिळणार आहेत. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 वर्ष सेवा झालेल्या सर्व ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे राज्य सरकारकडून मागवून घेतली आहेत. ओबीसींच्या एल्गार सभेकडे पाठ! पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत पंकजा […]
बीड : प्रत्येक पक्षानं कोणत्या नेत्यांना पाठवायचे याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आमच्या पक्षाकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे व डॉ. विकास महात्मे यांना पाठवले होते. ते त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे मी तिथे गेले नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी एल्गार सभेला अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांचे बॅनर्स लागूनही त्या […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यांची आज कोल्हापुरात सभा झाली. या सभेला संभाजीराजे येणार नसल्याची चर्चा होती. मात्र, शाहू महाराज आणि संभाजीराजे […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)-शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या विधानांमुळे मदत पूनर्वसन मंत्री आणि अजितदादा यांचे कट्टर समर्थक अनिल भाईदास पाटील (Anil Patil) हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल पाटील हे पुढच्या विधानसभेत दिसणार नाही असा गर्भित इशारा खुद्द शरद पवार यांनी दिला आहे. अनिल पाटील थेट पवार यांच्या रडारवर येण्याचे कारण काय? […]
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार टीका केली. यापूर्वी त्यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून जरांगेंवर टीका केली. आज तर जरांगेंचा एकेरी उल्लेख करत तुझं खातो का रे, असा सवाल त्यांनी केला. इतकचं नाही […]
Chhagan Bhujbal : लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे (Rajesh Tope) साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याला पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.त्याला सांगितलं शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना (Sharad Pawar) लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि […]