अहमदनगर : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश विश्वाला देणाऱ्या शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी कोट्यवधी साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात. ते श्रद्धेतून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. यातच साईचरणी वर्षभरात तब्बल 400 कोटींचे दान प्राप्त झाले आहे. मागील वर्षापेक्षा यंदाच्या दान रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. साईचरणी साई भक्तांनी भरभरून दान […]
संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच, या निवडणुकीचे रणशिंग महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून फुंकले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 जानेवारी रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. नड्डा यांच्या या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वच महत्वाचे नेते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे […]
नागपूर : राज्याची उपराजधानी असल्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. आजचं सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुधवारी (दि.28) सभागृहात विविध विषयांवर चर्चा झाली. गायरान जमीन प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर […]
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची आज कारागृहातून सुटका करण्यात आलीय. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्याची सीबीआयची विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून देशमुख हे आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख आता कारागृहाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख […]
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
नागपूर : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी भवनाबाहेर पोलिसांशी असभ्य वर्तन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनाच्या बाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीसह त्यांनी पोलिसांशी अर्वाच्च […]