एक बाप असेल तर येतील; संजय राऊतांचे शिंदे गटाला ‘चॅंलेज’

  • Written By: Published:
एक बाप असेल तर येतील; संजय राऊतांचे शिंदे गटाला ‘चॅंलेज’

नागपूरः शिवसेनेतील दोन्ही गटामध्ये जोरदार संघर्ष सुरूच आहे. बुधवारी मुंबई महानगरपालिकेतील मुख्यालयातील पक्ष कार्यालयाच्या ताब्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला. त्यावरून काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता शिंदे गट हा शिवसेना भवनाचा ताबा घेईल, असे बोलले जात आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या एक बाप असेल तर ते येतील, असे आव्हान राऊत यांनी दिले.

राऊत म्हणाले, बाप आले पाहिजे, त्यांचे बाप आले पाहिजे. एक बाप असतील तर येतील. हे ऑन कॅमेरा सांगतो. शिवसेना भवनाचा ताबा कोण घेणार?, शिवसेना भवन शिवसैनिकांचे आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू आहे. ती बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने राहील. ती आमची आहे. अशा घोषणा, वल्गना खूप होतात. महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायची तुमची तयारी असेल तर आमची तयारी आहे.

शिंदे गटाचे पदाधिकारी घुसखोर असल्याचा आरोप करताना राऊत म्हणाले, त्यांना स्वत:च अस्तित्व नाही. सगळीकडे घुसखोरी करण्यात येत आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा हा सत्ता असल्यामुळे आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या मग दाखवतो. गद्दारांची जगभरात एक पद्धत आहे, ते कुठेही घुसतात. महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून, पक्ष एकत्र आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकात गेले होते. त्यावरून शिंदेवर टीका करताना राऊत म्हणाले, रेशीमबागमध्ये जाणे चुकीचे नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जोड्याने जात असतील, तर उद्या मुख्यमंत्री सभागृहात खाकी पॅन्ट, काळी टोपी घालतील. पक्षांतर पाहिले आहे, आता रक्तांतर होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube