नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आशा काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘रामगिरी’वर खास स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला व आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री या ना त्या कारणामुळं कायमच चर्चेत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडं शिंदे गटातील आणखी एक मंत्री चर्चेत आलेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार […]
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडी पडत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी दिवसभर थंडीची लाट होती. भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम भारतात ४८ तासांनंतर दांडी कमी होण्याची शक्यता आहे, मात्र या काळात थंडी कायम राहणार आहे. दरम्यान पुढील 5 दिवस देशाच्या […]
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच टीकेची झोड उठविणारे कालिचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. देश आणि धर्मासाठी हत्या करणं हे वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य अकोल्याचे कालिचरण महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमदार मिटकरी म्हणाले, कालिचरण महाराज हा व्हाह्यात माणूस असून […]
नागपूर : विधान भवनमधील भोजन व्यवस्थेबाबत दिरंगाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांगलेच फैलावर घेतले. झालेल्या दिरांगाईबाबत या शासकीय अधिकाऱ्यांना लेखी स्पष्टीकरण देण्याबाबत यावेळी सांगण्यात आले. आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, विधान परिषद सचिव […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्देचे अनेक प्रकार देशासह राज्यातील काही भागांत याआधी समोर आलेले आहेत. याविरोधात अनेकांनी प्रयत्न करुन असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अनेकदा नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. अंधश्रध्देविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रगतशील समाज कायम अग्रेसर राहीला आहे. अशातच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एका पेटत्या चिते […]