Maharashtra Rain Alert : अमरावती, सातारासह आज ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे तर दुसरीकडे काही भागात रिमझिम पाऊस देखील पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे तर दुसरीकडे काही भागात रिमझिम पाऊस देखील पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे 7 ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी आज सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला (Akola) , अमरावती (Amravati) , यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात आज पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नागपूर शहरात रिमझिम पाऊस सुरु आहे.
तर दुसरीकडे 7 ऑगस्टनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला होता मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे.
धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना एकनाथ शिंदे घेणार PM मोदींची भेट-
यंदा मान्सूनवर एल निनोचा परिणाम दिसून येत असल्याने मान्सून सरासरीपेक्षा कमी प्रमाणात असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.