अजितदादांवर टीका करणार नाही, त्यांना सगळं माफ ; नितेश राणेंचे तोंडावर बोट

अजितदादांवर टीका करणार नाही, त्यांना सगळं माफ ; नितेश राणेंचे तोंडावर बोट

Nitesh Rane on Ajit Pawar : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत मोदी सरकार, शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं. तसेच नाव न घेता नितेश राणेंनाही (Nitesh Rane) फैलावर घेतलं.

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

पवार यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट), उद्धव ठाकरे यांनीही राणे कुटुंबावर टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी आज आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

राणे म्हणाले, काल उद्धव ठाकरे आणि अजितदादांनी माझ्या पत्रकार परिषदांचा उल्लेख केला. तसं म्हटलं तर अजितदादांना सगळंच माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून मी त्यांच्यावर काही टीका करणार नाही. पण, उद्धवजींना सांगेन तुमच्यावर बोललं तर तुम्हाला झोंबतं, पण तुमच्या सकाळच्या भोंग्यांचं काय ?, तुम्ही लोकांना टिनपाट म्हणता. मग तुमच्या सकाळच्या भोंग्याचं काय ?, हा माणूस (संजय राऊत) सातत्यानं आमच्या नेत्यांवर टीका करतो हे तुमच्या नेत्यांना दिसत नाही का ? असा सवाल राणे यांनी केला.

Bchhu kadu : वज्रमूठ तुटणार! ‘सामंत-पवारांची भेट म्हणजे राजकीय भूकंपाचे संकेत’

अजित पवार काय म्हणाले ?

आपल्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. राज्यात सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. टिल्ली पिल्ली लोकं सुद्धा काहीही बोलायला लागली आहेत. आपण काय बोलतोय त्यातील काही शब्द मीडियाला दाखवताही येत नाहीत. अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाचा कारभार चालू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube