महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ‘या’ कारणांमुळे ठरली वादग्रस्त
Maharashtra Kesari Wrestling Tournament Turned Controversial : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) 2025 स्पर्धा ही अहिल्यानगर शहरात पार पडली. मात्र, या स्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वी स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ (Ahilyanagar News) पाहायला मिळाला.
कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून असलेल्या नांदेडचा डबल केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा पराभव झाला. मात्र पंचांनी आपल्या विरोधात निर्णय दिलेला असून ही मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप करत राक्षे यांनी थेट मंचावरूनच पंचांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याने ही स्पर्धा अत्यंत वादग्रस्त ठरली. तर अंतिम सामन्यांमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ (Maharashtra Kesari Wrestling Tournament) यांच्यामध्ये सामना झाला, तर गायकवाड यांनी देखील मैदानातून निघून गेले अन् मोहोळ विजय ठरले. मोहोळ हे जरी महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले असले तरी मात्र शिवराज राक्षे यांच्याकडून झालेले पंचाला मारहाण असो किंवा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे ही अत्यंत वादग्रस्त ठरली. अंतिम सामन्याच्या दिवशी नेमकं मैदानावरती काय घडलं, हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.
अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं ?
उपांत्य फेरीच्या सामना हा डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या नांदेडच्या शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाला. प्रेक्षकांचे आणि कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून असलेली ही लढत अत्यंत महत्त्वाची होती लढत सुरू झाली. मोहोळ याने टाकलेल्या डावामध्ये शिवराज हा खाली पडला, मात्र त्याची पूर्ण पाठ ही टेकलेली नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते. मात्र पंचांनी मोहोळ याला विजयी घोषित करून टाकले, मोहोळचे समर्थक तिथे मैदानावरतीच जल्लोष साजरा करू लागले.
पंचांनी दिलेल्या या निर्णयावर तर राक्षे यांनी तेथेच आक्षेप घेतला. आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्यानंतर राक्षे यांनी मैदानावरून जात असताना पंच आणि राक्षे यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर राक्षे यांनी मंचावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील चर्चा केली. पुन्हा एकदा मैदानावरती आला.
डॉलरच्या तुलनेत रूपया 87 वर, ट्रम्पच्या टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण
मात्र पंच देतील तोच निर्णय अंतिम असल्याने राक्षे आणि पंचांमध्ये बाचाबाची सुरू झाली. राक्षे यांना राग अनावर झाल्याने त्यांनी पंचाची थेट कॉलर पकडत त्यांना एक लाथ मारली, एकच गोंधळाला सुरुवात झाली. मैदानाबाहेर आलेल्या राक्षे यांनी पंचाच्या निर्णयावरती आक्षेप घेतला, त्याचबरोबर राक्षे यांचे प्रशिक्षक तसेच हितचिंतकांनी देखील आक्षेप घेत निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे अपील देखील केले. मात्र, नियमानुसार कुस्ती चित्रपट झाल्यास त्या निर्णयावरील अपील स्वीकारले जात नाही. यामुळे पृथ्वीराज मोहोळ हेच विजेते ठरले.
अंतिम सामन्यात गायकवाडने सोडले मैदान
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाला. सुरुवातीपासूनच महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेतला, मात्र तेवढ्याच ताकतीने पृथ्वीराजने प्रतिकार करत महेंद्रला गुण घेऊन दिला नाही. त्यानंतर 30 सेकंदाच्या कालावधीमध्ये महेंद्रने गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये महेंद्रने एक गुण मिळवत सामना एक एकच्या बरोबरीवर आला. शेवटचा एक मिनिट शिल्लक असताना मोहोळवर डाव टाकण्याच्या नादात महेंद्र हा मॅचच्या बाहेर गेल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. शेवटचे 30 सेकंद राहिले त्यावेळेस महेंद्रने देखील गुणासाठी अपील केले, मात्र ते फेटाळून लावण्यात आले.
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये अभिषेक शर्माने रचला नवा इतिहास; हिटमॅन रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम मोडला
अवघे 30 सेकंद राहिले… आता काय होणार? याकडे प्रेक्षकांची लक्ष लागलेले असताना महेंद्रने अचानक मैदान सोडून थेट खाली निघून गेला. यावेळी उपस्थित असलेले पंचांनी पृथ्वीराजला विजय घोषित करून टाकले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी किताब हा पृथ्वीराज मोहोळला देण्यात आला.
राक्षे अन् गायकवाड दोघांवरही कारवाई
अहिल्यानगर मध्ये भरलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये या स्पर्धेला मोठे गालबोट लागले. आज मोहोळ जरी महाराष्ट्र केसरी झाले, मात्र शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्या कृत्यामुळे ही स्पर्धा वादग्रस्त ठरली. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पंचाला लाथ मारल्यामुळे राक्षे यांचे तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले तर सामना सुरू असताना पण त्यांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने महेंद्र गायकवाड यांच्यावरती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी कारवाई केली आहे. त्यांचे दोघांचेही तीन वर्षांसाठी त्यांचे निलंबन केले आहे.
कुस्तीत राजकारण…चर्चांना उधाण
अहिल्यानगर शहरांमध्ये यंदाची 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. अहिल्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वादग्रस्त ठरलेल्या या स्पर्धेमध्ये उपांत्य पेरूच्या सामन्यांमध्ये राक्षविरुद्ध मोहोळ हा सामना महत्त्वाचा ठरला. या सामन्यात राक्षे यांचा पराभव झाला मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नाही कारण आपले दोन्ही खांदे टेकलेले नसताना आपण पराभूत झालो, असा निर्णय पंचांनी दिला यावर राक्षे यांनी आक्षेप घेतला. पंचांनी माझ्यावर अन्याय केला, मी पुणे जिल्ह्याचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार म्हणून माझ्यावर अन्याय झाला. मला पराभूत करण्यासाठी हे जाणून-बुजून करण्यात आले, असे राक्षे यांनी म्हटले. यामुळे कुठेतरी या केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये राजकारण झाले की काय, अशीच चर्चा ही कुस्तीप्रेमींसह प्रेक्षकांमध्ये होती.