स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

Supreme Court (1)

Local Bodies Electioins Supreme Court : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Bodies Electioins Supreme Court ) प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पूर्वी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारला आता 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालीयं. याआधी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अद्याप एकही निवडणूक पार न पडल्याने आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जाब विचारला. त्यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडली.

बातमी अपडेट होतेय…

follow us