CM शिंंदेंचा मोठा डाव; उद्धव ठाकरेंचे ‘विश्वासू’ मिलींद नार्वेकरांना लोकसभेची ऑफर?

CM शिंंदेंचा मोठा डाव; उद्धव ठाकरेंचे ‘विश्वासू’ मिलींद नार्वेकरांना लोकसभेची ऑफर?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde :  राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम सावलीसारखे वावरणारे, राजकीय निर्णयात सहभागी असणारे त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मिलींद नार्वेकरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ऑफर शिंदे गटाने दिल्याची माहिती आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शिंदे गटासमोर आहे. त्यात आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर यांनाच गळाला लावण्याचा प्लॅन आखला आहे. या मतदारसंघासाठी नार्वेकरांना शिंदे गटाने ऑफर दिल्याची चर्चा आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघसाठी भाजपही इच्छुक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठकाही घेतल्या आहेत. भाजपकडून मंत्री मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर आणि यशवंत जाधव इच्छुक आहेत. या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित नाही. जागावाटपात मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबतही काही ठरलेलं नाही. त्यामुळे हा मतदारसंघ कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांनाच थेट उमेदवारी गळ घातली आहे. जर शिंदे यात यशस्वी झाले आणि खरंच जर नार्वेकरांनी ठाकरेंची साथ सोडली तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरणार आहे. कारण, मिलींद नार्वेकर बाळासाहेब ठाकरेंपासून पक्षात काम करत आहेत. पक्षाची ध्येय धोरणे आणि महत्वाचे राजकीय निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असतो. उद्धव ठाकरे अडचणीत येतात त्यावेळी मिलींद नार्वेकर मदतीसाठी येतात. त्यामुळे ठाकरेंसाठी संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.

Uddhav Thackeray : माझ्या घराणेशाहीला विरोध केला तसा तटकरेंना करून दाखवा; ठाकरेंचे मोदींना आव्हान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube