PM मोदींकडून CM शिंदेंचं तोंडभरुन कौतुक; शंभुराज देसाईंनी थेट विधानसभेतच आणला आभाराचा प्रस्ताव!

PM मोदींकडून CM शिंदेंचं तोंडभरुन कौतुक; शंभुराज देसाईंनी थेट विधानसभेतच आणला आभाराचा प्रस्ताव!

CM Shinde Meet PM Narendra Modi : दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी शिंदेंबरोबर त्यांची पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून व नातू हे सर्व जण उपस्थित होते. मुख्यंत्री शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंत फोटो ट्विट करत याची माहिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत शिंदेंचे कौतुक केले. महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर आज विधीमंडळात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पंतप्रधान मोदींच्याबद्दल आभार प्रस्ताव मांडला.

Assembly Session : अजितदादांनी झापलं; रोहित पवारांचं काही मिनिटात प्रत्युत्तर!

शंभूराज देसाई काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांनी अलीकडे सहकुटुंब भेट घेतली होती. त्यानंतर अशा पद्धतीचे ट्विट माननीय पंतप्रधान महोदयांनी केलेले आहे. या ट्विटबद्दल आम्ही पंतप्रधान महोदयांचे आभार तर मानतोच तसेच त्यांचे ऋण देखील व्यक्त करतो.

मी आणि आम्ही सर्व सहकारी मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांना जवळून ओळखत असलेली प्रत्येक व्यक्ती पंतप्रधानांच्या मताशी निश्चितच सहमत होईल. त्यांचा एक जवळचा सहकारी  म्हणून आम्ही सगळ्यांनी सतत या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या केवळ विचारांचाच वारसा शिंदे साहेबांनी घेतला नसून ती आचरणात आणण्याची कृतीही अंगिकारली आहे.

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

दरम्यान, या भेटीनंतर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. ‘कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू मुख्यमंत्री’ असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींच्या या ट्विटनंतर थेत विधानसभेत त्यांच्या आभारासाठीचे निवेदन मंत्री शंभूराज देसाईंनी मांडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube