राज्यपालांनी दिली गुडन्यूज.. नोकरभरतीबाबत केली मोठी घोषणा, वाचा

राज्यपालांनी दिली गुडन्यूज.. नोकरभरतीबाबत केली मोठी घोषणा, वाचा

Maharashtra Budget Session 2023 : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh bais) यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2023) सोमवारी सुरूवात झाली. राज्यपालांनी अभिभाषणात राज्यातील नोकरभरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यपाल म्हणाले, की राज्यात विविध क्षेत्रात सरकारने भरती सुरू केली आहे. मराठा समाजासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लवकरच 75 हजार पदांसाठी नोकरभरती होणार आहे.

वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार

ते पुढे म्हणाले, की सीमाभागातील मराठी भाषकांसाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. गडचिरोली, गोंदिया येथे प्रशिक्षण संस्थाही सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन दहा हजार रुपये होती ती आता 20 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Ramesh Bais : राज्यपाल बैस यांनी घेतली संपूर्ण शपथ मराठीमधून

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आता अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदाचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून तरी असेच दिसत आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे काय झाले ? जुनी पेन्शन योजना, धनगर समाज, मराठा समाज, ओबीसी समाजाचे काय झाले ? शिंदे गटाला या सर्वांशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त आगामी निवडणुका सत्तेच्या, भ्रष्टाचाराच्या अशा कोणत्याही मार्गाने जिंकायची आहे. आम्ही त्यांच्या व्हीपला आजिबात भीक घालत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube