Maharashtra Rain : पावसाचे जोरदार कमबॅक! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : पावसाचे जोरदार कमबॅक! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार बरसत असलेला पाऊस आता थांबला असतानाच हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. कोकण विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा राज्यातील पावसावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

समृध्दी महामार्गावरील अपघातातून सरकारने धडा घेतला नाही; जयंत पाटलांचं सरकारवर टीकास्त्र

बांग्लादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज हे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये गंगाखोरे पार करण्याची शक्यता आहे. परिणामी आजपासून महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी तुरळक पावसाची शक्यता आहे. मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. गुरुवारी पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. कोल्हापूर घाट परिसरातही तुरळक पाऊस होईल असे सांगण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातही पाऊस

उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अजूनही फारसा पाऊस झालेला नाही. आता या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांत आज तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या (गुरुवार) पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. 3 ऑगस्ट नंतर कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होईल. त्यामुळे पुढील दोन आठवडे कदाचित पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस महत्वाचे असून या काळात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता मात्र आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube