आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंचं पहिलंच भाषण; राज्यपालांच्या घोषणेची करून दिली आठवण
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेत बोलण्याची संधी मिळाली. तांबे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नोकरभरतीबाबत केलेल्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला.
वाचा : Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही
आ. तांबे म्हणाले, की राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषणात राज्यात लवकरच 75 हजार नोकरभरती करण्यात येईल असे सांगितले होते. पण ही कधी भरती कधी होणार, कशी होणार याबाबत त्यांनी काहीच उल्लेख केला नाही. तसे पाहिले तर भरतीसाठी युवकांना नेहमीच रस्त्यावर उतरावे लागते. एमपीएससीचे विद्यार्थी तर दरवर्षी रस्त्यावर उतरतात. आज जलसंपदा विभागात मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत. मात्र, त्यापेक्षा कमी जागांची भरती होते.
Satyajeet Tambe : माझ्या ‘त्या’ ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही
शिक्षण क्षेत्राची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपायांच्या अनेक जागा रिक्त आहेत. राज्यात आजमितीस दोन लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. तर 75 हजारांच्या भरतीने कितपत न्याय मिळेल, असा माझा प्रश्न आहे, असे तांबे यांनी सांगितले.