नाना पटोलेंच्या मनात काय ? ; म्हणाले, राज्यातील घडामोडींसाठी पुढील आठवडा…

नाना पटोलेंच्या मनात काय ? ; म्हणाले, राज्यातील घडामोडींसाठी पुढील आठवडा…

Nana Patole on Maharashtras Situation : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या वायबी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना या घडामोडींबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही त्यांच्या बैठकीकडे लक्ष ठेऊन होतो. पुढील आठवडा राज्यातील घडामोडींसाठी अतिशय महत्वाचा आहे. पण, सध्या मी त्यावर काहीच बोलणार नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. पटोले यांच्या या वक्तव्याने राजकारणातील सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव

मी पुन्हा येईन असे म्हणणारे पुन्हा आले पण, उपमुख्यमंत्री बनून आले. माझ्यासारखा कार्यकर्ता असता तर मी आलोच नसतो. भाजप पुन्हा सत्तेत तरी येईल का ते त्यांनी पहावे. ते काय बोलतात, आजकाल काहीच कळत नाही असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

धर्माच्या नावावर कुणी गुंडागर्दी करत असेल तर ते आजिबात मान्य करता येणार नाही. धर्माच्या नावावर आम्ही कधीच राजकारण करत नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून ते प्रत्येक निवडणुकीत धर्माचा आधार घेत असतात. पण आता लोक सुद्धा हुशार झाले आहेत, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या वायबी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने जमा झाले असून कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. येथे एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केला आहे.

जयंत पाटलांचं एकाच वाक्यात ट्विट पण, ‘ते’ ठासून का सांगितलं ?

शरद पवार यांनी मुंबईत लोक माझे सांगाती पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेपासूनच राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर दोन दिवसांनी अंतिम निर्णय सांगतो असे पवार यांनी काल सांगितले होते.

त्यानंतर आज अध्यक्षपद निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube