कर्नाटकच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस; शरद पवारांनी केली मोठी घोषणा

कर्नाटकच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस; शरद पवारांनी केली मोठी घोषणा

Sharad Pawar on Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कली आहे. नागालँडमध्ये मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढणार आहे. काही मोजक्याच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या अयोध्या दौऱ्यातील फरक’

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार छगन भुजबळ उपस्थित होते.

निवडणुकीत उमेदवार उतरविण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, कर्नाटकात आमचं ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. मराठी भाषिक आहेत, त्या मराठी भाषिकांमध्ये मतभेद नकोत, एकवाक्यता कशी करता यईल. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल ही आमची भूमिका राहणार आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास भाजपचा फायदा होईल का या प्रश्नावर पवार म्हणाले, कर्नाटकात जवळपास 224 जागा आहेत. आम्ही पाच ठिकाणी उमेदवार उभे केले तर भाजपला फायदा होईल असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

फडणवीस म्हणाले… हा तर शरद पवारसाहेबांचा अपमान

काँग्रेस जिंकणार : पवार

कर्नाटक निवडणुकीबाबत शरद पवार यांनी मोठं भाकित केले. ते म्हणाले, राज्यातील परिस्थिती मला माहिती आहे. मी अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. काँग्रेस सत्तेवर येईल, असे तेथील चित्र आहे. कर्नाटकातील लोकांना आता बदल हवा आहे आणि हा बदल भाजपचे उमेदवार घरी बसवून लोकांना हवा आहे, असे पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube