महाराष्ट्राचा मूड काय? लाडकी बहिण योजनेचा महायुतीला किती फायदा..

महाराष्ट्राचा मूड काय? लाडकी बहिण योजनेचा महायुतीला किती फायदा..

Maharashtra Elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे घमासान (Maharashtra Elections) सुरू झाले आहे. महविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचं उत्तर निकालानंतर मिळेलच पण आतापासूनच विजयाचे दावे केले जात आहेत. यातच काही ओपिनियन पोल सुद्धा (Opinion Poll) समोर आले आहेत. ताज्या पोलनुसार या निवडणुकीत भाजप (BJP) राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर (Jammu Kashmir Elections) सर्वांच्या नजरा महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांकडे (Jharkhand Elections) असेल. आगामी काळात या राज्यांमध्ये घडामोडी वेगाने घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आजमितीस सहा मोठे राजकीय पक्ष बनले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विभाजन झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष आहे.

Jammu Kashmir Election : भाजपची 44 जणांची यादी रिवाईज; आता ‘स्पेशल-15’ उमेदवार मैदानात

टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या एका सर्वेमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढाई होणार आहे. महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. तरीही मागील निवडणुकीचा विचार केला तर यावेळी भाजपच्या जागा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री पदासाठी कोण फेवरेट?

मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेच्या मनात कोण आहे असाही प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यामुळे सर्वेत याबाबतही मते जाणून घेण्यात आली. या पोलमधून जे निष्कर्ष समोर आले त्यानुसार राज्यातील 37 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच पसंती दिली. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) प्रत्येकी 21-21 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. शरद पवार यांना (Sharad Pawar) दहा टक्के तर अन्य नेत्यांना 11 टक्के मते मिळाली.

लाडकी बहिण योजनेचा किती फायदा

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा मिळेल का असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भातही सर्वे करण्यात आला. 58 टक्के लोकांच्या मते ही योजना खूप चांगली आहे. 24 टक्के लोकांना वाटते की ही योजना काही प्रमाणात चांगली आहे. तर सहा टक्के लोकांना वाटतं की या योजनेचा महायुतीला निवडणुकीत काहीच फायदा मिळणार नाही. सात टक्के लोकांनी ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचाराचा नवा मार्ग असल्याचे सांगितले.

Maharashtra Politics : विधानसभेसाठी पवारांचा डाव यशस्वी; भाजपचा मोठा एक्का अखेर हेरलाच

follow us
  • fb
  • instagram
  • youtube