केसरकरांचा आणखी एक गौप्यस्फोट; म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पद..

केसरकरांचा आणखी एक गौप्यस्फोट; म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पद..

Deepak Kesarkar on Eknath Shinde : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एकामागोमाग एक गौप्यस्फोट करत आहेत. केसरकर यांनी आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पु्न्हा वाद होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला.

केसरकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. भाजपसोबत जाण्याची तुमची इच्छा नव्हती. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलात. संजय राऊत म्हणाले होते की 40 लोकांचे मुडदे पाडणार. शिंदे साहेबांचा अपमान झाला म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले. मी नामर्दाकडून मरणार नाही असा बोलणारा आमचा नेता आहे. 80 टक्के समाजकारण करणारे ते खरे शिवसैनिक आहेत.

https://letsupp.com/politics/bjp-leader-sujay-vikhe-ahmadnagar-60113.html

ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबई शहर ओळखले जाते. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आमचे सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठाम उभे राहतात. विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

केसरकरांचा पहिला गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं नसतं तर त्यांनी सर्व आमदारांना परत पाठवून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. शिंदे यांनी आमदारांसाठी जीवाचीही पर्वा केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे केसरकर म्हणाले. अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केल. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहेत. कारण, शिंदेंचा अपमान झाला तो दिवस वर्धापनदिनाचा होता.

https://letsupp.com/maharashtra/sujay-vikhe-on-ahmadnagar-district-divide-60132.html

एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. शिंदेंनी म्हटलं, मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही. तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं शिंदेंनी सांगितल्याचं केसरकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube