‘हा तर त्यांचा अंतर्गत चित्रपट, पटकथाही अंतर्गत’; राष्ट्रवादीतील नाट्यावर फडणवीसांचा खोचक टोला

‘हा तर त्यांचा अंतर्गत चित्रपट, पटकथाही अंतर्गत’; राष्ट्रवादीतील नाट्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने आज फेटाळला. तसेच त्यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत राजीनामा फेटाळल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘हा सगळा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकारही अंतर्गत आहेत. त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत हा सिनेमा संपत नाही तो पर्यंत आम्ही त्यावर काय प्रतिक्रिया देणार? या पटकथेचा ज्यावेळी शेवट समजेल त्यावेळी यावर प्रतिक्रिया देऊ’, असे फडणवीस म्हणाले.

खबरदार! मॅच फिक्सिंग कराल तर होईल पोस्टमॉर्टम ; Nana Patole यांचा इशारा कुणाला ?

त्यानंतर राज्याच्या राजकारणात या ज्या काही घडामोडी घडल्या. त्या स्क्रिप्टेड वाटतात का ? या प्रश्नावर फडणवीस यांनी प्रतिसवाल केला ते म्हणाले, ‘मी कुठं असं म्हटलंय ?’ कर्नाटकात (Karnataka Elections) भाजप हद्दपार होईल असा दावा काँग्रेसने केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘काँग्रेसचा हा विचार म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत’, असा टोला त्यांनी कांँग्रेस नेत्यांना लगावला.

उद्धव ठाकरेंचा विकासविरोधी चेहरा 

‘उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) विकास विरोधी चेहरा आता बाहेर आला आहे. त्यांना बारसू येथील जनतेशी काही देणेघेणे नाही. विकासाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे त्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. आता त्यांना बारसूतील लोकांचा खांदा मिळाला आहे.’

जयंत पाटलांचं एकाच वाक्यात ट्विट पण, ‘ते’ ठासून का सांगितलं ?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube