मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? बच्चू कडूंनी तारीखच सांगून टाकली

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? बच्चू कडूंनी तारीखच सांगून टाकली

Bachchu Kadu on Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे.

आता या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठा दावा केला आहे. साधारण 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे कडू यांनी सांगितले.

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

ते म्हणाले, आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास काही हरकत नाही. एक मंत्री दहा जिल्ह्यांचा कारभार सांभाळत आहे. लोकांची कामे होण्यासाठी तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत, असे कडू म्हणाले.

दरम्यान, सध्याचा विचार केला तर मंत्रिमंडळात वीस मंत्री आहेत. विस्तार रखडल्याने एकाच मंत्र्याकडे दोन ते चार खात्यांचा कारभार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही महसूलमंत्री पदाबरोबरच नगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाचा कार्यभार आहे. आणखीही काही मंत्री अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.

त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. मात्र, सत्तासंघर्षाचा निकाल येत नव्हता त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. या प्रक्रियेत विलंब होत असल्याने जे आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते त्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले होते.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube