‘भाजप अजगर अन् मगरीसारखी जे त्यांच्याकडे गेले त्यांना खाल्ले’; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut attacks on BJP : भारतीय जनता पार्टी (BJP) ही अजगर आणि मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपने खाऊन टाकले. या पक्षाचा हा मूळ स्वभाव आहे. त्यांनी त्यांची भूमिका सोडलेली नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला.
शिंदे गटात सहभागी झालेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी काल भाजप आम्हाला सापत्नपणाची वागणूक देत आहे. लोकसभेला आम्ही 22 जागांवर दावा करण्याची गरज नाही. 22 जागा आमच्याच आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोध आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपवर प्रहा करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी हाच मुद्दा उचलत भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
पुण्याचा जागेवर राष्ट्रवादीने ‘अधिकृतपणे’ ठोकला दावा; अजित पवार म्हणाले, हो आम्ही इच्छूक!
राऊत पुढे म्हणाले, गजानन किर्तीकरांसारखा जुना सहकारी तिथे जाऊन सुद्धा सुखी आनंदी नाही याचा अर्थ भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे. त्यातील एक एक कोंबडी त्यांनी आता कापायला सुरुवात केली आहे.
किर्तीकर यांनी शिंदे गटात जाणे आमच्यासाठी वेदना देणारे होते. पण आज ते भाजपा आम्हाल नीट वागवत नाही, आम्हाला लाथा घालताहेत असं सांगतात. मग याआधी आम्ही तरी काय वेगळं सांगत होतो, असा सवाल त्यांनी केला. भाजपने शिवसेनेला अशीच वागणूक दिली त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो. किर्तीकरांनी जे सांगितले तीच आमचीही भूमिका आहे. दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही, शिवसेनेच्या आमदार, खासदारांची कामे रखडून ठेवली, असा आरोप राऊत यांनी केला.
फुटलेल्या गटातही फूट
राऊत पुढे म्हणाले, मला मिळालेल्या माहितीनुसार फुटलेल्या गटात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. या गटातही आता दोन गट पडले आहेत. भाजपने शिवसेनेच्या प्रमुख लोकांना नेहमीच अपमानित करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली तेच आता किर्तीकरांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.
मोबाईल पाण्यात पडला; जलाशय 3 दिवस 30 एचपी पंपानं उपसला; अधिकाऱ्याच्या प्रतापाने संतापाची लाट