‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही’.. देसाईंनी सांगितली तेव्हाची परिस्थिती

‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही’.. देसाईंनी सांगितली तेव्हाची परिस्थिती

Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला अन् तिथेच सगळं बिनसलं. न्यायालयानेही अगदी स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं, असं म्हटलं. या मुद्द्यावर आता शिंदे गट व भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे.

राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही यावर भाष्य केले आहे. देसाई म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्हाला वेगळी भूमिका घेता आली असती. ठाकरेंनी स्वेच्छेने पदाचा त्याग केला म्हणून नवीन सरकार आले.

Video : ‘दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा’; न्यायालयाच्या निकालावर अजितदादांची मिश्कील प्रतिक्रिया

16 आमदारांच्या निलंबनाच अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे हे आधीपासूनच सांगत होतो. हे सरकार कोसळणार असे विरोधक सांगत होते. ते चुकीचे होते. आजच्या निकालावरून हे स्पष्ट झालं आहे. निकालाबाबत ठाकरे गटाने आणि उपाध्यक्ष झिरवळ यांनी आततायीपणा केला. आता आमचे सरकाराला कोणताही धोका नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला.

अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे.

संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (दि.11 मे) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्णा कुमारी, न्या. हेमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणावर निकाल दिला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube