Sanjay Raut : शिंदेंची खुर्ची संकटात? राऊतांनी सांगितलं नेमकं राजकारण!
Sanjay Raut : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. शिंदे गट आणि भाजपात आणखी एका साथीदाराची भर पडली आहे. आता अजितदादांबरोबर आणखी 9 आमदारांनीही शपथ घेतली. त्यामुळे या आमदारांनाही मंत्रीपदे द्यावी लागणार आहेत. आधीच्या शिंदे गटातील अनेकांना अजूनही मंत्रीपद मिळालेली नाहीत. त्यातच आणखी वाटेकरी आल्याने शिंदे गटातील रोष प्रचंड वाढला आहे. या राजकारणावर महाविकास आघाडीतील नेते टीका करत आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या बातम्या समोर येत आहेत. त्यानुसार हे अपेक्षितच होतं. हा (एकनाथ शिंदे बंड) औटघटकेचा खेळ होता. बहुमत 170 चे असतानाही 40 जणांचा एक गट नव्याने आणला जातो याचा अर्थ तुमची गरज संपली. आता आपण गाशा गुंडाळणार, असे राऊत म्हणाले.
दिलीप वळसेंबद्दल सांगताना साहेबांचे डोळे पाणावले होते, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
ते पुढे म्हणाले, शिंदे गटाची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत. त्यांना जर त्यांची जुनी वक्तव्ये आठवत असतील तर त्यांनी आता तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं त्यांच्यासोबत बसणार नाही, अजित पवारांमुळे आम्ही पक्ष सोडला असं म्हणणाऱ्याांना आता तत्काळ राजीनामे द्यावेत, असा हल्लाबोल राऊत यांनी शिंदे गटावर केला.
अजित पवार यांच्या ९ मंत्र्यांची शपथ होते पण बाशिंग बांधून बसलेल्यांना शपथ दिली जात नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार हे नक्की. त्यांच्या भांडणात आम्ही पडणार नाही. जागा वाटपाबाबत यांच्याशी चर्चा देखील कोणी करणार नाही. 90 जागा अजित पवार मागत आहेत तर शिंदेना किती तुकडे मिळणार आहे ? असा सवाल करत त्यांच्यासोबत चर्चा देखील कोणी करणार नाही, असे राऊत म्हणाले.
साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्या
पाकिस्तानला दम देता, चीनमध्ये घुसून दाखवा
मणिपूरमधली स्थिती जम्मू कश्मीरपेक्षाही भयंकर झाली आहे. येथील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करायला वेळ आहे. संघटनात्मक बदल करायला वेळ आहे मात्र, मणिपूरबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. मणिपूरमधील इंटरनेट बंद करणं म्हणजे मणिपूरला देशापासून वेगळं करणं आहे. पाकिस्तानला उठसुट दम देत आहात एकदा त्या चीनमध्ये घुसून दाखवा, असे आव्हान राऊत यांनी मोदी सरकारला दिले.