‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी पहा’; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी पहा’; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Vinayak Raut replies Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले, ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीस यांनी आजिबात करू नये. तुमचे चंद्रकांत पाटील एक बोलतात दुसरीकडे बावनकुळे वेगळेच बोलत आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या असे जे भाजपमध्ये चालले आहे खासकरून मिंधे गटाला सोबत घेतल्याने भाजपला जी पनोती लागली आहे त्याची देवेंद्र फडणवीस यांनी आधी काळजी करावी.

गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर; शिंदे गटाच्या आमदाराने डिवचलं

शिंदे गटातील असंतोष उफाळून येतो आहे. खोके मिळाले पण विकासकामे होत नाहीत. चार पाच मंत्री सोडले तर कुणालाही विकासकामांसाठी निधी मिळत नाही हा मोठा असंतोष शिंदे गटात असून तो लवकरच उफाळून बाहेर येईल. उद्धव ठाकरेंना फसवलं गेलं होतं त्यांचं पितळ आता उघड होईल. आजपर्यंत किरीट सोमय्या यांनी ज्या तक्रारी केल्या त्या फक्त बदनामी करण्यासाठीच केल्या आहेत. त्याच्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. एनजीटीने अनिल परब यांना जी क्लिन चीट दिली आहे त्यातून हे सिद्ध होत आहे.

नितेश राणेला भाजपने पाळला

नितेश राणे आमच्या दृष्टीकोनातून चिनपाट माणूस आहे त्याला आम्ही किंमत देत नाही. फक्त भुंकण्यासाठी भाजपने त्याला पाळला आहे आणि भुंकणारा कुत्रा कधी चावत नसतो.

कर्नाटकचा नाही, येथे उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला; राऊतांनी आघाडीच्या नेत्यांना ठणकावले!

काय म्हणाले फडणवीस ?

सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख भाजपने खुराड्यात पाळेलल्या कोंबड्या आणि 13 तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आहे आणि असंतुष्टता आहे. तीन ते चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे त्याच ठाकरे गटातल्या की त्याच ठाकरे गटाच्या संदर्भात मी बोलण्याऐवजी भविष्यात तुम्हाला कळेल असा टोला त्यांनी लगावला होता.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube