Maharashtra Rain : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ भागात जोरधार

Maharashtra Rain : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ भागात जोरधार

Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर दिलासा देणारी बातमी आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे.

आता पुढील 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Maharashtra Rain) होईल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होईल तसेच राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाचा अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Maharashtra Rain Update : मुंबई-पुण्यात पावसाचं आगमन; पुढील आठवड्यात राज्यात पाऊस कोसळणार

तसे पाहिले तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांत पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्रीनंतर सकाळ साडेआठपर्यंत दहा तासांत 83.5 मिलीमीटर पाऊस पडला. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

10 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचं कमबॅक

राज्याच्या काही भागातही पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावल्याने सप्टेंबर महिण्याची सुरूवात चांगल्या पावसाने झाली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात न पडलेल्या पावसाचा बॅकलॉग सप्टेंबरमध्ये भरून काढावा अशी आपेक्षा आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये उद्यापासून कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maratha Agitation : पोलीस फोर्स हटवला; तणावपूर्ण शांततेत मनोज जरांगेंचे आंदोलन पुन्हा सुरु

काल शनिवारी मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र आता ही वाहतूक सुरळीत सुरू आहे. पहाटेपासूनच या संततधार पावसाला सुरूवात झाली होती. या पावसामुळे शहरातील गेलया काही दिवसांपासून निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे. पुण्यातही काही भागात पाऊस पडला. या पावसाने अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. फक्त पुणे शहरच नाही तर पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube