Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस, कोकणात ऑरेंट तर विदर्भ मराठवाड्याला यलो अलर्ट…

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस, कोकणात ऑरेंट तर विदर्भ मराठवाड्याला यलो अलर्ट…

Maharashtra Rain : देशभरात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. तर काही ठिकणी अद्यापही पावसाची वाट पाहावी लागत आहे. हवामान विभागाकडून कोकणात आज ऑरेंज तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rain in various parts of Maharashtra, orange in Konkan and yellow alert in Vidarbha Marathwada)

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दिल्लीत फेरबदल, सोनिया दुहान यांच्याकडे मोठी जबाबदारी

मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून मुंबईतील काही भागांत पावसाचं पाणी साचल्याची परिस्थितीत असून वाहतुकीवर याचा चांगलाच परिणाम होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे जोरदार सुरु असलेल्या पावसाने पाण्याच्या साठ्यात चांगलीच भर पडलीय. राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे.

ज्या प्रवृत्तीविरोधात आमचा संघर्ष त्यांच्यासोबत आमचे सहकारी…; शरद पवारांचा हल्लाबोल

विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी निरभ्र आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरीदेखील पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचा खरिप हंगाम वाया जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘अजित पवार निधी देत नव्हते, मग आता सोबत कसे? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं…

यंदाच्या वर्षी मान्सून 8 जुलैच्या आधीच दाखल झाल्याने दिलासा मिळालायं. राज्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्ली उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये पावसानं जोरदार बँटिंग केली आहे. यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तरेतील या राज्यांत झालेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे.

दरम्यान, जूननंतर आता जुलै महिन्यात चांगलाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून त्यानूसार राज्यातील काही भागांत पाऊस बरसत आहे. मात्र, काही ठिकाणी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने शेतकरी वर्गाच्या पेरण्यांची कामे रखडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube