‘2024 साठी आशिर्वाद मागता, आधी फडणवीसांकडून शिका’; ठाकरे गटाचा मोदींना खोचक सल्ला

‘2024 साठी आशिर्वाद मागता, आधी फडणवीसांकडून शिका’; ठाकरे गटाचा मोदींना खोचक सल्ला

Saamana Editorial : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) यांनी देशाला दहाव्यांदा संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात विविध योजनांची माहिती दिली. देशाने कोणती उद्दीष्टे साध्य केली हे सुद्धा सांगितले. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचा मुद्दा उपस्थित विरोधकांवर जोरदार प्रहार केले. त्यांच्या याच भाषणावर आजच्या सामनातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. देशभरातील प्रत्येक महत्वाच्या पदावर गुजरातमधूनच माणसे भरली जातात ही सुद्धा घराणेशाहीच आहे, असा टोला लगावण्यात आला.

हिमाचलात पावसाचा हाहाकार! चार दिवसांत 71 मृत्यू, 1700 घरे जमीनदोस्त

मोदींचे हे लाल किल्ल्यावरील शेवटचे भाषण

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री एकाच राज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष एकाच राज्याचे होते. सर्व सूत्रे व अंमलबजावणीचे अधिकार आपल्याच हाती असावेत याच उदात्त हेतूने सर्व काही सुरू आहे हे घराणेशाहीचेच रूप आहे. देशातील न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत. घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते.

आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असेल. त्यामुळे लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे. ही लालू यादवांची भविष्यवाणी 140 कोटी लोकांची, स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवणी ठरू शकेल! राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सांगितले की लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे. श्री. लालू यादव जे बोलले ते खरे ठरो, लालू यादवांच्या तोंडात साखर पडो अशा प्रकारच्या भावना देशाच्या गावागावांत आहेत.

मोदींनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं ?

स्वातंत्र्यदिनी लोकशाहीच्या पिपाण्या वाजवणे, तिरंगा फडकवून भाषण देणे हा एक उपचार झाला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या 40 कोटी होती. 77 वर्षात आपण 140 कोटींवर पोहोचलो पण, 140 कोटी जनता स्वातंत्र्य मिळाल्याचे सुख खरोखर भोगत आहे काय. मोदी यांनी जनतेला असे आश्वासन दिले की मला पुन्हा संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन. मात्र याआधी 2014 आणि 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले ते आधी सांगा, असा सवाल या लेखातून विचारण्यात आला आहे.

टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही; अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

आधी फडणवीसांकडून शिका

भाषणात मी पुन्हा येईन व 2024 ला मीच तिरंगा फडकवेन असे मोदींनी जाहीर केले. हा त्यांचा अहंकार आहे. पुन्हा येईन सांगणाऱ्यांची काय हालत होते ते त्यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे पाहून शिकायला हवे, असा खोचक टोलाही ठाकरे गटाने मोदींना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube