Samruddhi Accident : समृद्धी अपघातातील मृतांचा आकडा वाढला; फडणवीसांनी दिले ‘हे’ आदेश

Samruddhi Accident : समृद्धी अपघातातील मृतांचा आकडा वाढला; फडणवीसांनी दिले ‘हे’ आदेश

Samruddhi Accident : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने येथे काम करणाऱ्या काी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषण करण्यात आली. तसेच या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

गर्डर मशीनल जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरून काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे. तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मशीन खाली किती जण दबले गेले आहेत याची निश्चित माहिती सांगणे सध्या कठीण आहे. बचावकार्य वेगात सुरू आहे.

या ठिकाणी गर्ड बसविण्याचे काम काल रात्री सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळ कुणाला सावध होण्याचीही संधी मिळाली नाही. पुलाचे गर्डर जोडणारी ही क्रेन साधारण 200 फूट लांबीची आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री दादा भुसे शहापूर तहसीलदार, माजी आमदार पांडुरंग बरोरा घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube