‘भारताच्या चौक्यांवर चीनचा कब्जा, मोदी सरकार उत्तर देणार का? राऊतांचा सवाल

‘भारताच्या चौक्यांवर चीनचा कब्जा, मोदी सरकार उत्तर देणार का? राऊतांचा सवाल

Sanjay Raut criticized PM Narendra Modi : खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अखंड हिंदुस्थान अशी संकल्पना मोदी सरकार मांडत असेल तर चीनने घेतलेला भारताचा भाग अखंड हिंदुस्थानात येत नाही का, तर पाकिस्तानप्रमाणे चीनबाबत भारताची आक्रमक भूमिका का नाही, असा सवाल राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली. राऊत म्हणाले, सीमारेषेतून 65 गस्ती चौकीवरचा चीनकडे आपला ताबा गेला आहे. ते आपल्या हद्दीत घुसलेले आहेत हे सगळ्यांना माहित आहे. मग भारत सरकार याबाबत स्पष्ट का सांगत नाही? यावर ते का गप्प आहेत? पाकिस्तानच्या संदर्भात जी आपली आक्रमक भूमिका असते ती चीनच्या बाबतीत का नाही? असे सवाल राऊत यांनी केले. प्रधानमंत्री अमेरिकेत गेलेले आहेत त्यांनी चीनचा मुद्दा जागतिक पातळीवर मांडायला पाहिजे होता, असे राऊत म्हणाले.

मोठी बातमी : आदित्य ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, कुणाच्या मुसक्या आवळणार?

भारत कायम सज्ज आहे असे सांगितले जाते. मग ती सज्जता मणिपूर (Manipur Violence) मध्ये का नाही? मणिपूर हा सुद्धा चीनला लागून असलेला भाग आहे. मग ही सज्जता मणिपूरमध्ये का नाही, मणिपूर का पेटले त्या अतिरेक्यांच्या हातात शस्त्र कोण देते कोण पुरवते?यासंदर्भात आपण वक्तव्य केलं असतं तर देशाला मार्गदर्शन मिळालं असतं, असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला.

केसीआर यांनी भूमिका स्पष्ट करावी 

मुंबईत बीआरएसचे पोस्टर लागले आहेत लागू द्या. या देशात लोकशाही आहे. कोणताही राजकीय पक्ष कोणत्याही राज्यात जाण्यास स्वतंत्र आहे. पण केसीआर यांच्या मनात काय आहे हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे.  तुम्हाला नेमकं कुणासाठी काम करायचं आहे हे केसीआर यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube