एप्रिलमध्ये राज्यात होणार मेगा शिक्षकभरती; भरली जाणार हजारो पदे
राज्यामध्ये 30 हजार रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जूनपुर्वी ही पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32 हजार शिक्षक कमी आहेत. याचसह प्राथमिक शाळांमध्ये 29 हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवण्यात येणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियुक्ती ही पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार आहे.
Girish Bapat : खासदार बापट यांची प्रकृती चिंताजनक; रूग्णालयात उपचार सुरू
आता शिक्षक होण्यासाठी टेट बंधनकारक असून टेट उत्तीर्ण शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. शिक्षक भरतीसाठी त्यानंतरच शिक्षकांना अर्ज करण्यात येणार आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
Maharashtra Politics: तानाजी सावंतांच्या ‘त्या’ विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा!
दरम्यान, सध्या देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यामध्ये 75 हजार नोकऱ्या देणार असल्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे. त्यानंतर आता राज्य शासनाने शिक्षक भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे.