Girish Bapat : खासदार बापट यांची प्रकृती चिंताजनक; रूग्णालयात उपचार सुरू

  • Written By: Published:
Girish Bapat : खासदार बापट यांची प्रकृती चिंताजनक; रूग्णालयात उपचार सुरू

Girish Bapat Health Update : पुण्याचे भाजपचे खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजन असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Hopital) उपचार सुरू आहेत. बापट गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. असे असतानाही त्यांनी मध्यंतरी कसबा पोट निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

‘ऑपरेशनचं सांगू नका, मुका मार आम्हालाही देता येतो’; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मध्यंतरी कसबा पोट निवडणुकीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बापट यांनी केसरी वाड्यात नाकाला ऑक्सिजन ट्यूब लावून हजर होते. पल्स मीटरने सतत त्यांची तपासणी केली जात होती. थेट व्हीलचेअरवर बसून बापट प्रचारात उतरल्याने त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मध्यंतरीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील बापट यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

एप्रिलमध्ये राज्यात होणार मेगा शिक्षकभरती; भरली जाणार हजारो पदे

दरम्यान, मंगेशकर रूग्णालयाकडून काढण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये (Girish Bapat Health Bulatine) बापट हे दिनानाथ रूग्णलयात ICU विभागात अॅडमीट असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ते लाईप सपोर्टवर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा रूग्णालय प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिन काढले जाणार आहे. डॉक्टर बापट यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.

गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. त्यांचा मतदारसंघातील वावर जवळपास संपला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्यात गिरीश बापट यांना बोलताना प्रचंड धाप लागत होती. परंतु, इच्छाशक्तीच्या बळावर गिरीश बापट यांनी त्यांची कामगिरी फत्ते केली होती.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; 10 मे रोजी होणार मतदान

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube