दोन हजार कोटींच्या आरोपांवर नरेश म्हस्केंचा पलटवार; म्हणाले, राऊतांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा

दोन हजार कोटींच्या आरोपांवर नरेश म्हस्केंचा पलटवार; म्हणाले, राऊतांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा

Thane News : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (Shivsena) नाव व धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद रविवारी दिवसभर राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत होते. राज्य सरकारमधील मंत्री पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही राऊत यांनी या वक्तव्याची लवकरच किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला होता. नगरसेवकासाठी 50 लाख, आमदारांसाठी 50 कोटी असे भाव ठरल्याचाही आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपांना आता ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनीही राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. म्हस्के म्हणाले, की ‘राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का ?, असा प्रश्न विचारावासा वाटतो. जेलमधून बाहेर आल्यापासून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावे,’ असा सल्ला म्हस्के यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, की राऊत यांनी शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती. त्यांनी त्यांचे काम फत्ते केले. भांग असेल किंवा गावठी ब्रँड असेल त्याच्या नशेत ते बडबडत असतात. न्यायालयाने यांच्या बाजूने निकाल दिला तर देशात न्यायव्यवस्था आहे असे म्हणायचे आणि विरोधात निकाल गेला की टीका करायची. उद्या सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्यावर हे लोक टीकाच करणार असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

हे वाचा : Sanjay Raut ना ‘ते’ वक्तव्य भोवणार ? ; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांने दिला इशारा

दरम्यान, रविवारी दिवसभर राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचीच चर्चा सुरू होती. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्यापासून राऊत आधिक आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देत न्यायालयात दाद मागणाक असल्याचे सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube