राज्यात बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो ठप्प! ई-चलन विरोधात वाहतूकदार संघटना आज संपावर
Maharashtra Transport Strike : ई-चलन विरोधात आज राज्यातील वाहतूक संघटनांनी संपाची घोषणा केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात ई-चलनविरोधात
Maharashtra Transport Strike : ई-चलन विरोधात आज राज्यातील वाहतूक संघटनांनी संपाची घोषणा केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात ई-चलनविरोधात आंदोनल करण्यासाठी राज्यभरातील तब्बल 1 लाख चालक आणि वाहन मालक पोहचणार आहे. ई-चलनबाबत सरकारकडून लावण्यात आलेले नियम वाहनचालकांसाठी आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या हानिकारक असल्याने नियम मागे घ्या अशी मागणी वाहतूक संघटनांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणात वाहतूक संघटना आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासबोत एक बैठक पार पडली होती मात्र या बैठकीत काही तोडगा निघाला नसल्याने आजपासून वाहतूक संघटनांनी संपाची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीच्या नेतृत्वाखालील या संपाला ट्रक, टॅक्सी, ऑटो-रिक्षा, खाजगी बस आणि स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. संपामुळे आज टॅक्सी, ऑटो-रिक्षा, अॅप-आधारित कॅब (ओला आणि उबर), खाजगी आणि इंटरसिटी बसेस, स्कूल बसेस, मालवाहू ट्रक आणि टँकर यांसारखी वाहने (Maharashtra Transport Strike) रस्त्यावर दिसणार नाही.
ई-चलान नियमावर वाद का?
नवीन नियमानुसार, जर एखाद्या चालकाला ई-चलन मिळाले आणि त्याला आव्हान द्यायचे असेल, तर त्यांना प्रथम एकूण दंडाच्या 50% रक्कम जमा करावी लागेल असा आरोप संघटनांचा आहे. वाहतूक संघटनांचे म्हणणे आहे की, या नियमामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि अनेक चालकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. काही प्रकरणांमध्ये, डिजिटल दंड वाहनाच्या बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे नोंदवले जात आहे. वाहतूक संघटनांच्या मुख्य मागण्या वाहतूक संघटनांनी सरकारसमोर अनेक मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये ई-चालान आव्हान देण्यासाठी 50% अडव्हान्स रक्कम भरण्याच्या नियमात बदल, वाहतूक वादांसाठी स्वतंत्र न्यायालयीन प्राधिकरणाची स्थापना, जुने आणि चुकीचे ई-चालान रद्द करणे आणि पॅनिक बटणे आणि एफडीएसएस सारख्या महागड्या उपकरणांच्या अनिवार्य स्थापनेवर बंदी घालणे यांचा समावेश आहे. संघटनांच्या मते, राज्यात सुमारे 4,500 कोटी रुपयांचे ई-चालान प्रलंबित आहेत, त्यापैकी बरेच तांत्रिक त्रुटींमुळे जारी करण्यात आल्याचे म्हटले जाते.
निलेश घायवाळ कनेक्शननंतर आता कौटुंबिक वाद…, सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट?-
तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, सरकार वाहतूक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आहे. या मुद्द्यावर आज आणखी एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे.
