ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर; वाचा सविस्तर कार्यक्रम

विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image (46)

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जाहीर होणार असून, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान पडणार आहे. तर, मतमोजणी याच दिवशी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे आदी सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.  या 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूकही पार पडणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम 

अ.क्र. निवडणूक प्रक्रिया दिनांक आणि वेळ
1 निवडणुकीची अधिसूचना जारी करणे 23 एप्रिल, 2026 (गुरुवार)
2 उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल, 2026 (गुरुवार)
3 उमेदवारी अर्जांची छाननी 2 मे, 2026 (शनिवार)
4 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 4 मे, 2026 (सोमवार)
5 मतदानाचा दिनांक 12 मे, 2026 (मंगळवार)
6 मतदानाची वेळ सकाळी 09:00 ते दुपारी 04:00 पर्यंत
7 मतमोजणी (निकाल) 12 मे, 2026 (मंगळवार) सायंकाळी 05:00 वाजता
8 निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक 13 मे, २०२६ (बुधवार)

 

कोणते सदस्य होणार आहेत निवृत्त?

1. नीलम दिवाकर गोऱ्हे
2. उद्धव बाळासाहेब ठाकरे
3. संदीप दिवाकर जोशी
4. दादाराव यादवराव केचे
5. अमोल रामकृष्ण मिटकरी
6. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील
7. राजेश धोंडीराम राठोड
8. शशिकांत जयवंतराव शिंदे
9. संजय किशनराव केनेकर

कुणाली किती जागा मिळणार?

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5,  शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

विधानसभेत कोणाचे किती संख्याबळ? 

भाजपा- 132 – 1 = 131
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जनसुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)

महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
मविआ = 16+10+20+2+1 = 49
इतर = 03
एकूण = 286 आमदार

 

follow us