ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर; वाचा सविस्तर कार्यक्रम
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जाहीर होणार असून, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान पडणार आहे. तर, मतमोजणी याच दिवशी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे आदी सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या 9 जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूकही पार पडणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
| अ.क्र. | निवडणूक प्रक्रिया | दिनांक आणि वेळ |
| 1 | निवडणुकीची अधिसूचना जारी करणे | 23 एप्रिल, 2026 (गुरुवार) |
| 2 | उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस | 30 एप्रिल, 2026 (गुरुवार) |
| 3 | उमेदवारी अर्जांची छाननी | 2 मे, 2026 (शनिवार) |
| 4 | उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस | 4 मे, 2026 (सोमवार) |
| 5 | मतदानाचा दिनांक | 12 मे, 2026 (मंगळवार) |
| 6 | मतदानाची वेळ | सकाळी 09:00 ते दुपारी 04:00 पर्यंत |
| 7 | मतमोजणी (निकाल) | 12 मे, 2026 (मंगळवार) सायंकाळी 05:00 वाजता |
| 8 | निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक | 13 मे, २०२६ (बुधवार) |
कोणते सदस्य होणार आहेत निवृत्त?
1. नीलम दिवाकर गोऱ्हे
2. उद्धव बाळासाहेब ठाकरे
3. संदीप दिवाकर जोशी
4. दादाराव यादवराव केचे
5. अमोल रामकृष्ण मिटकरी
6. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील
7. राजेश धोंडीराम राठोड
8. शशिकांत जयवंतराव शिंदे
9. संजय किशनराव केनेकर
कुणाली किती जागा मिळणार?
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभेत कोणाचे किती संख्याबळ?
भाजपा- 132 – 1 = 131
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जनसुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
मविआ = 16+10+20+2+1 = 49
इतर = 03
एकूण = 286 आमदार