सत्तासंघर्षावरील निर्णयाआधी नार्वेकरांचे मोठे विधान; म्हणाले 16 आमदारांचा निर्णय फक्त…
राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा काही दिवस आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेदेखील नाव आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर आता राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 16 आमदारांच्या निलंबनावर नार्वेकरांनी मोठे विधान केले आहे. संबंधित निलंबनासंदर्भातील कारवाई फक्त विधानसभा अध्यक्षच करु शकतात. कोणतीही इतर संस्था अध्यक्षांकडून हा अधिकार काढून घेऊ शकत नाही. माझं असं ठाम मत आहे की, जोपर्यंत विधानसभाअध्यक्ष याबाबत ठाम निर्णय देत नाही, तोपर्यंत कोणतीही संविधानिक बॉडी यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही, अशी संविधानिक तरतूद असल्याचे नार्वेकरांनी म्हटले आहे.
मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनच्या दौऱ्यावर जात असून त्याअगोदर त्यांनी हे भाष्य केले आहे. माझा लंडन दौरा पूर्वनियोजित होता. मी असल्याने किंवा नसल्याने काहीही फरक पडणार नाही. आमदार निलंबनाचा व माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हे प्रकरण जर माझ्याकडे आलं तर मी 16 आमदारांना निलंबित करेल. यावरदेखील नार्वेकरांनी उत्तर दिले आहे.
वाद चिघळला! गेहलोतांना घेरण्यासाठी पायलट काढणार जनसंघर्ष यात्रा, प्लॅनिंग काय ?
मला वादात पडायचे नाही. मात्र विधानभेचे जे नियम आहेत, त्यानुसार ज्यावेळी अध्यक्षांचे कार्यालय रिक्त असते तेव्हाा कार्यालयाचे अधिकार उपध्यक्षांकडे असतात. मात्र आपल्या देशातील कायदे भविष्यासाठी आहेत. संबंधित आमदारांवर निलंबनाची कारवाई फक्त विधानसभा अध्यक्षच करु शकतात, असे त्यांनी सांगितले आहे.