राज्यात पुन्हा ‘कोसळ’धार! ‘या’ दिवसापासून पावसाचे कमबॅक; हवामानाचा अंदाज काय?

राज्यात पुन्हा ‘कोसळ’धार! ‘या’ दिवसापासून पावसाचे कमबॅक; हवामानाचा अंदाज काय?

Weather Update : राज्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली असून सर्वत्रच पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलै महिन्यात मुसळधार बरसणारा पाऊस ऑगस्टमध्ये मात्र एकदमच गायब झाला आहे. ढगाळ हवामान असले तरी पाऊस काही होत नाही. भारतीय हवामान खात्यानेही ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पुढील आठवड्यात सुद्धा पावसाची अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 18 ऑगस्टनंतर जोरदार पाऊस होईल असे सांगण्यात आले. 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त

राज्यात सर्वत्रच पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. दोन दिवसांपूर्वी नगर शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी पहाटे पुण शहर परिसरात पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशीच स्थिती राहिली तर पेरण्यांची परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच कोकण, पश्चि महाराष्ट्रात मागील महिन्यात पावसाने थैमान घातले होते. या भागातील अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. आता मात्र येथेही पाऊस थांबला आहे. मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खरीपातील पेरण्यांसाठी सध्याच्या परिस्थितीत पाऊस होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube