Gokul Milk : गोकुळ ‘अध्यादेशासाठी’ सरकारने मोजले तब्बल 80 लाख ; बंटी पाटील म्हणाले…
Gokul Milk : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ चर्चेत आलं आहे. नुकतंच झालेल्या निवडणुकीत
Gokul Milk : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ चर्चेत आलं आहे. नुकतंच झालेल्या निवडणुकीत बहुमत असून देखील काँग्रेस नेते सतेज पाटील यांना सत्ता स्थापन करता न आल्याने महायुती सरकारवर विरोध चारही बाजूने हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे निवडणुकीनंतर महायुतीने मोठा निर्णय घेत गोकुळवर पाच शासन नियुक्त संचालक नेमले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. विरोधकांच्या या याचिकेविरोधात युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 80 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांचे 80 लाख रुपयांचे शुल्क अदा करण्याबाबत सहकार विभागाने शासन निर्णय काढला आहे. तर आता यावर काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार (Mahayuti Government) टीका केली आहे. 80 लाखांची उधळपट्टी कशाला? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
गोकुळमध्ये (Gokul Milk) सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा. एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल 80 लाख रुपयांची उधळपट्टी ? अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी
गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी ? #लक्षातठेवलंय२०२९
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 23, 2026
नेमकं प्रकरण काय?
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर गोकुळची सत्ता ताब्यात घेण्यासाठी महायुती सरकारने काही नियमांमध्ये बदल केले होते. वार्षिक 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर एक शासकीय आणि चार अशासकीय असे पाच संचालक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. तसेच या संचालकांना मतदानाचा देखील अधिकार राज्य सरकारकडून देण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 अ(2) मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरुद्ध सरकारची बाजू मांडण्यासाठी मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना सरकारची बाजू मांडण्यासाठी एका दिवसाच्या युक्तिवादासाठी 80 लाख रुपये शुल्क देण्यात आले आहे.