दारुमाफियांच्या सांगण्यावरुन हल्ला.., आमदार प्रज्ञा सातवांचा विधानसभेत खुलासा

दारुमाफियांच्या सांगण्यावरुन हल्ला.., आमदार प्रज्ञा सातवांचा विधानसभेत खुलासा

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. काल विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिशनात त्या बोलत होत्या.

विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्याचा जरब वाढलाय, कारण त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय.., दफ्तराचे ओझे कमी होणार

दारुमाफिया, महिलांच्या अत्याचाराविरोधात मी अनेकदा आवाज उठविला. जनतेसाठी आवाज उठविल्याने मला त्रास सहन करावा लागत आहे. दारुमाफियांच्याविरोधात आवाज उठविला असल्यानेच माझ्यावर त्यांच्या सांगण्यावरुन हल्ला झाला होता, असा खुलासा सातव यांनी विधानसभेत केला.

एका हमालाची कमाल…यूट्यूबवर पाहून घरीच थाटला नोटांचा कारखाना

जिल्ह्यात अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत असून विरोधकांनी माझ्याविरोधात असे कितीही कट कारस्थाने रचले तरीही जनतेसाठी माझा आवाज कोणीच दाबू शकत नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, मी महाराष्ट्राची लेक आहे, माँसाहेब जिजाऊंची, सावित्रीची, रमाईची लेक असल्याने विरोधक माझं काही करु शकत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

कळमनुरीच्या कसबे धवांडा इथे सातव दौऱ्यावर असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येत पाठीमागील बाजून हल्ला केला. यावेली त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न हल्लेखोराकडून करण्यात आला होता. एका महिला आमदारावर असे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला असून पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरुन या असा सज्जड इशारा सातव यांनी हल्ला झाल्यानंतर दिला होता.

तोंडाला मास्क, हातात रॉड घेऊन आलेल्या अज्ञातांकडून संदिप देशपांडेंवर हल्ला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube