‘ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल?; पंकजा मुडेंचा सवाल, बीडमध्ये निषेधाचे बॅनर…

  • Written By: Published:
‘ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल?; पंकजा मुडेंचा सवाल, बीडमध्ये निषेधाचे बॅनर…

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 11 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यानं त्यांच्या निषेधाचे बॅनर लागले आहेत.

पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. आज ही यात्रा त्यांच्या मूळ जिल्ह्यात येत असताना त्यांच्या निषेधार्थ बॅनर लावण्यात आले. तेलगाव (ता. धारूर) येथील चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचं नमुद करत निषेध व्यक्त करण्यात आला. हे बॅनर सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आल्याचं बोलल्या जात आहे.

पंकजा मुंडे यांनी देवदर्शनानिमित्त शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. राज्यभरात यात्रेचे जल्लोषात स्वागत होत असून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या समाजबांधवांवरील लाठीहल्ल्याचा पंकजा मुंडे यांनी निषेध केला.

शिवाजी कर्डिलेंसह मुलगा गोत्यात; धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश 

आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम असून आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंकजा मुंडे यांनीही यावर आपले मत मांडले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण दोन समाजात भांडणे लावू नयेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

यानंतर पंकजा मुंडे यांचा सकल मराठा आरक्षणाला विरोध असल्याचं नमूद करत त्यांचा निषेध करणारे बॅनर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आले. राज्यरात भव्य स्वागत झालेल्या पंकजा मुंडे यांना त्यांच्याच जिल्ह्यात विरोध आणि निषेधाला तोंड द्यावं लागत असल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. एकीकडे भाजपने शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे निषेधाच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
लोकांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकण्यासाठी वंशावळी वंशावळी पाहूनच निर्णय घेता येईल. जो तो वर्ग आपापल्या ठिकाणी आहेच. त्यांना दुसऱ्या वर्गात कसं टाकता येईल? त्यांची वंशावळी पाहावी लागेल. ते ओबीसीत नसतील तर ते टाकणं सोपं नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण दोन समाजात संघर्ष निर्माण करू नये, असे पंकजा म्हणाल्या होत्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube